Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

उदयनराजेंनाही ‘पुष्पा’ चित्रपटाची भुरळ, लुंगी नेसून पोहोचले सेल्फी पॉईंटवर

Share On
  • कार्यकर्त्यांना फ्लाइंग किस देत उडवली कॉलर

सातारा |

सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केलेल्या चित्रपटातील गाणी आणि स्टाईलने अनेकांना भुरळ पाडली आहे. चित्रपटातील गाण्यांवर अनेकजण रिल्स तयार करत असून त्याचे मिम्सही बनवले जात आहेत. दरम्यान बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाची भुरळ साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही पडली आहे.

आपल्या डायलॉगाबाजी तसंच स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असणारे उदयनराजे रविवारी साताऱ्यात पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ नेसून पोहोचले होते. यावेळी त्यांनी फोटो काढण्याचा आनंद लुटला. प्रसारमाध्यमांनी त्यांना लुंगी नेसण्याचं विशेष कारण विचारलं असता, मोकळं वाटतंय, छान वाटतंय असं उत्तर दिलं. उदयनराजेंसोबत त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही लुंगी नेसली होती.

सेल्फी काढल्यानंतर उदयनराजे आपल्या कारमध्ये जाऊन बसले तेव्हा गाडीत ‘पुष्पा’ चित्रपटातील गाणं सुरू होतं. या गाण्यावरही उदयनराजे फिदा असल्याचं दिसत होतं. मग काय नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलमध्ये फ्लाईंग किस देत उदयनराजेंनी कॉलर उडवली. ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. सुकुमार यांनी याच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, हिंदी भाषांमध्ये हा चित्रप प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

 

 

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button