Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाचपैकी तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक लढवणार : शरद पवार

मुंबई । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी 3 राज्यात राष्ट्रवादी युती करुन निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी आपण लवकरच उत्तर प्रदेश दौरा देखील करणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आगामी विधानसभा लढवणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.

शरद पवार म्हणाले की, आज भाजपचे नेते तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का पोहोचला आहे. आणखी भाजपते 13 आमदार भाजप सोडणार असून, यापुढे भाजपला गळती लागणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button