Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. अरुण मांडे यांना ‘धन्वंतरी सन्मान पुरस्कार’ प्रदान

नगर |

‘आरोग्य भारती’ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘धन्वंतरी सन्मान पुरस्कार’ यंदा डॉ. अरुण मांडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. संस्थेचे अखिल भारतीय संघटन सचिव अशोक वाष्र्णेय यांच्या हस्ते पुरस्कार डॉ. मांडे यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे प्रांत सदस्य डॉ. किशोरकुमार पूरकर, पश्चिम क्षेत्र संयोजक मुकेश कसबेकर, जिल्हाध्यक्ष अशोकराव करंदीकर, श्रीपाद शिंदीकर, मिलिंद चवंडके, प्रकाश गोसावी, ज्योती गोसावी, डॉ. पौर्णिमा पुरकर, निर्मला मांडे आदी उपस्थित होते.

पूरकर यांनी सन्मानपत्राचे वाचन करून डॉ. मांडे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील निरपेक्ष योगदानाची माहिती दिली. डॉ. मांडे यांच्या कार्याचा गौरव करून वाष्र्णेय म्हणाले,की आजारी व्यक्तीची प्रामाणिकपणे सेवा करणे हा वैद्यकीय सेवेचा मूळ हेतू आहे. अलिकडे आजारी व्यक्तीला विविध तपासण्यांमध्ये अडकवून आर्थिकदृष्टय़ा लुटण्याचे सुरू झालेले काम वैद्यकीय क्षेत्रास काळिमा फासणारे आहे. उच्चतंत्रज्ञान व अद्ययावत मशिनरी हाती असूनही अचूक निदान करता येत नाही, ही वस्तुस्थिती मन सुन्न करते. रुग्णाशी चर्चा करायला डॉक्टरांना वेळ नाही. जास्तीत जास्त रुग्ण हाताळण्यात धन्यता मानली जाते. चर्चा करण्यामधून समोर येणारे नवनीत रुग्णास आजारपणामधून कायमस्वरूपी बाहेर काढण्यास उपयुक्त ठरते. आज अशा डॉक्टरांचीच समाजाला खरी गरज आहे. सत्कारास उत्तर देताना डॉ.अरुण मांडे म्हणाले, रुग्णसेवा करताना अनेक कुटुंबांचा ‘फॅमिली डॉक्टर’ होता आले, याचे समाधान वाटते. निर्मला मांडे यांनी भक्तिगीत गायले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button