ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या राजगुरुनगरमध्ये, शेतकरी मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या राजगुरुनगरमध्ये, शेतकरी मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या (शनिवारी) राजगुरुनगर शहरात येणार आहेत. राजगुरुनगर शहरात होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आणि खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सहकारमहर्षी साहेबरावजी सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देखील करण्यात येणार आहे. याशिवाय हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारित नवीन इमारतीचे भूमिपूजन ही शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

अनेक दिवसानंतर शरद पवार जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *