Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

ब्रिटनमध्ये कोरोनाची त्सुनामी, २४ तासांत ९३ हजार नवे रुग्ण

लंडन – ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराने युरोपसह जगातील सर्व देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनमध्ये तो अतिशय वेगाने पसरत आहे. तेथे सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णवाढीने विक्रम केला आहे. ब्रिटनमध्ये २४ तासांत ९३ हजार ४५ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. याशिवाय एका दिवसात १११ जणांचा बळी गेला आहे. गुरुवारी ब्रिटनमध्ये ८८ हजार कोरोनाचे रुग्ण सापडले होते. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या १ कोटी १० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४७ हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही आकडेवारी पाहता देशात कोरोनाची त्सुनामी आली आहे, असे ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एक आठवड्यापूर्वी देशात कोरोनाची त्सुनामी येईल, असे भाकीत आरोग्य मंत्रालयाने केले होते. ते आता खरे ठरले आहे, असे स्कॉटलंडचे मंत्री निकोला स्टर्जन यांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे देशातील सर्व नाईट क्लब २६ डिसेंबरपर्यंत बंद करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा सापडलेला ओमिक्रॉन हा कोरोना व्हायरसचा नवा प्रकार डेल्टाच्या तुलनेत ७० पट अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगातील सर्व देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्याला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्याबरोबरच मास्क, सामाजिक अंतर, घरात खेळती हवा ठेवणे आणि हात वारंवार धुणे ही खबरदारी घेतली पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group