राज्यात आठ नवीन ओमायक्रॉन बाधित रूग्ण
पुणे | राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात आठ नवीन ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या 28 वर पोहचली आहे.राज्यात मंगळवारी आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबईत सात जण तर वसई-विरारमधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर, आतापर्यंत राज्यभरात आढळून आलेल्या 28 ओमायक्रॉन बाधितांपैकी 9 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयामधून सुट्टी देखील मिळालेली आहे.
याचबरोबर महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 684 नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत, तर 686 रूग्ण कोरनामुक्त झाले आहेत. याशिवाय 24 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 66,45,136 झाली आहे. राज्यात आजपर्यंत 64,93,688 जण करोनामुक्त झाले आहेत. तर, 1,41,288 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या 6 हजार 481 आहे.





