क्रिडापिंपरी / चिंचवडपुणे

डॉक्टर क्रिकेट स्पर्धेत कन्सल्टंट संघाची बाजी

कोरोनाच्या कठीण काळानंतर क्रिकेटच्या मैदानात डॉक्टर झाले रिफ्रेश

पिंपरी | प्रतिनिधी

नगरसेवक वसंत बोराटे आणि डॉक्टर्स असोसिएशन मोशी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांसाठी भव्य टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कन्सल्टंट संघास विजेतेपद तर पुणे वॉरियर संघाने उपविजेतेपद पटकाविले. कोविड काळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करणाऱ्या डॉक्टरांनी क्रिकेटच्या मैदानात मूड रिफ्रेश केला.

पिंपरी-चिंचवड, मावळ आणि खेड तालुक्यातील डॉक्टरांसाठी या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 25 संघात सुमारे 300 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. 9, 10 आणि 11 डिसेंबर रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. या सामन्यांमध्ये डॉ निलेश पाटील आणि डॉ आनंद कराळे हे उत्कृष्ठ फलंदाज तर उत्कृष्ठ गोलंदाज डॉ श्रीकांत सूर्यवंशी ठरले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व मोशी डॉक्टर्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.

याबद्दल अधिक माहिती देताना नगरसेवक वसंत बोराटे म्हणाले, कोविड काळात अहोरात्र रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांसाठी या टुर्नामेंटचे आयोजन केले होते. त्यामध्ये सुमारे तीनशे डॉक्टरांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या दरम्यान अनेक डॉक्टरांमध्ये चांगले खेळाडू दिसून आले. या स्पर्धेत टुर्नांमेट खेळताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला समाधान देऊन गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group