Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

आक्षेपार्ह वक्तव्यावरुन खासदार संजय राऊतांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय महासचिव दीप्ती रावत भारद्वाज यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार मंडावली ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

संजय राऊत यांनी ९ डिसेंबरला मराठी वृत्त चॅनलला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात अपशब्द वापरले होते. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेचा वापर केला होता, असा आरोप दीप्ती रावत यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यावरून दिल्ली पोलिसांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध मानहानी, महिलांविषयी अपमानकारक शब्दांचा वापर आणि हावभाव प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button