Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगावमध्ये भाजपाची ताकद आणखी वाढणार : नारायणशेठ बारणे

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, थेरगावमध्ये भाजपाची ताकद आणखी वाढली असून, भाजपाचे वर्चस्व राहील, असे मत जनसेवा सहकारी पतसंस्थेचे संस्थापक नारायणशेठ बारणे यांनी व्यक्त केले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी नारायणशेठ बारणे यांनी आपली दोन्ही मुले रोहित आणि रोहन बारणे यांच्यासह भाजपाचे कमळ हाती घेतले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी संतोष कलाटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदशीव खाडे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांवर विश्वास…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर आपला विश्वास आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करीत आहोत. थेरगावमध्ये भाजपाची ताकद निश्चितपणाने वाढणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व राहील, या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत, अशा भावना नारायणशेठ बारणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button