रुपीनगरमध्ये संगम, विकास हाऊसिंग सोसायट्यांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याच्या कामाला सुरुवात

पिंपरी | प्रतिनिधी
संगम आणि विकास हाऊसिंग सोसायटीमध्ये धोकादायक असलेल्या विजेच्या तारांचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शांताराम बापू भालेकर व आमदार महेश लांडगे यांच्या स्वखर्चातून या सोसायट्यांमध्ये भूमिगत वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या कामाचा शुभारंभ नुकताच स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.
रुपीनगर येथे धोकादायक विद्युत तारांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावत होता. संगम हाऊसिंग सोसायटी आणि विकास हाऊसिंग सोसायटीमध्ये सुमारे तीन हजार नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांना घरापासून हाताच्या अंतरावर असलेल्या विद्युत तारांचा मोठा धोका होता. पावसाळा, वादळी वारा अशा वेळी तर या विद्युत तारांची नागरिकांवर टांगती तलवार होती. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी आणि निवेदने दिली होती. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नव्हता.
नागरिकांनी हा प्रश्न भारतीय जनता पार्टी रुपीनगर-तळवडे मार्फत आमदार महेश लांडगे यांच्यापुढे मांडला. आमदार महेश लांडगे यांनी तात्काळ हे काम स्वखर्चातून करण्यास संमती दिली. आमदार महेश लांडगे यांनी मुख्य 3.5 x 300 चौरस मीमी आल्युमिनिअम आरमडची 500 मीटर (1600 फूट) केबल व नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी 2 कोर 4 चौरस मीमी आरमड केबल, त्यासाठी लागणार एलटी मिनी फिडर पिलर, 400 अॅम्पिअर क्षमतेचे 8 बॉक्स स्वखर्चाने दिले.
भूमिगत विद्युत वाहिनी जोडल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला मोफत विज जोडणी करून मिळणार आहे. या कामाची सुरुवात नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. यावेळी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, माजी नगरसेवक रघुनंदन घुले, रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एस डी भालेकर, रुपीनगर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन कदम साहेब, घरजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, सचिव बंडू राणे, उपाध्यक्ष गौतम मोकाशी, बळीराम गोळे, बाबुराव गाडे, केंब्रिज स्कूलचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर, संगम सोसायटीचे चेअरमन हनुमंत जाधव, मुरलीधर भालशंकर, सुखदेव म्हस्के, राजाराम खरे, बाळू मिठे, रफिक नदाफ, बाळाराम उत्तेकर, विश्वास मोरे, मामा जाधव, पोलीस उपनिरीक्षक भिंगवडे, भाजपाचे शिवाजी बोडके, शिरीष उत्तेकर, दादा सातपुते, किरण पाटील, विनोद नवले, विक्रम हिवरे, अनिल भालेकर, अण्णा गवळी, रविराज शेतसंधी, मधुकर सोनगिरे, सागर चव्हाण, साजिद मुलाने, शाम भालेकर, रामदास गवारे, रोहिदास भालेकर, हनीफ मुल्ला, राजेंद्र खोल्लम, दीपक शिंदे, सोमनाथ मेमाने, रामदास कुटे, मयूर बोडके, केतन पाटील, वसंत शिंपी, पंढरीनाथ भालेकर, हणमंत कलमोरगे, भिवाजी थोरात, राजाराम भालेकर, दत्तात्रय कुंभार, रामदास गवारे, सुदाम मुळीक, दत्ता चव्हाण, समीर जगताप, दीपक बोर्डे, बाळू तुपे, राजाभाऊ तापकीर, बाळू मिठे, बबन भालेकर, मधुकर भालेकर, संतोष शिंदे, सचिन गायकवाड, अशोक कोकणे, मंगेश नखाते, अजित जाधव, सद्दाम नदाफ, सुनील आमणे, विकास सकपाळ, दाभाडे साहेब, शंकर खुटाळे, मीनल बेले, सीमा गायकवाड, संगीता काळे, वैशाली भालेकर, शीतल वरणेकर, मंगल भालेकर, पूजा खरे, सीमा खरे, भालशंकर ताई, शितल साल्ढाणा, तसेच महावितरणचे ज्युनिअर इंजिनिअर हुलसुलकर आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.




