Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; तिसऱ्या आघाडीवर होणार चर्चा?

मुंबई |
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट होणार आहे.ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या काही दिवसांतल्या ममता बॅनर्जींच्या भेटीगाठी या काँग्रेसला बाजूला ठेवून होताना दिसत आहेत. त्याचबरोबर घटकपक्षांना फटका बसू नये याचीही काळजी घेताना बॅनर्जी दिसत आहेत. काही काळापूर्वीच आपण उत्तरप्रदेशातून लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे त्या तिथला घटक पक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाची मदतच करताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी सक्रीय असल्याचं चित्र आहे. शरद पवारांसोबतची भेट हा त्याचाच महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.





