TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे  | नामवंत साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, व्याख्याते, ‘महाराष्ट्रभूषण’, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय 100) यांचे आज (सोमवारी) पहाटे पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांदरम्यान पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे पार्थिव सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या पर्वती पायथा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार असून सकाळी साडेदहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यातशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी घरी पाय घसरून पडल्याने पुरंदरे यांना दुखापत झाली होती. दरम्यान त्यांना न्यूमोनियाची लागण सुद्धा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. पुरंदरे यांना तात्काळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.बळवंत मोरेश्वर तथा ब. मो. पुरंदरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावानेच ओळखले जात. बाबासाहेबांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button