Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूर आणि परिसरात ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप

कोल्हापूर – कोल्हापूर आणि परिसराला शनिवारी मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्‍टर स्केल एवढी भूकंप मापन यंत्रावर नोंद झाली होती. यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

कोल्हापूर आणि परिसर मध्यरात्री १२च्या सुमारास भूकंपाने हादरला. त्यामुळे झोपेत असलेले नागरिक घाबरून घराबाहेर पडले. यामुळे काही काळ कोल्हापूर आणि परिसरात खळबळ माजली होती. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल असली तरी नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूर शहरापासून १९ किलोमीटरवर पश्चिमेला होता, असे नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने पत्रकात म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button