मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत महिलेच्या खात्यातून काढले 40 हजार रुपये

मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत महिलेच्या खात्यातून काढले 40 हजार रुपये

पिंपरी चिंचवड | एटीएम मधून पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या महिलेला मदत करण्याचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने महिलेचे एटीएम कार्ड अदलाबदल केले. त्यानंतर महिलेच्या एटीएम कार्डद्वारे 40 हजार रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 26) दुपारी आळंदी-भोसरी रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर मध्ये घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा जावेसोबत एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्या. भोसरी-आळंदी रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये फिर्यादी गेल्या असता तिथे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडील एटीएमची अदलाबदल केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या एटीएम कार्डद्वारे त्यांच्या खात्यातून 40 हजार रुपये रक्कम काढून फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *