Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन- २०२२ : पिंपरी- चिंचवडमधील शिवसेना विभाग प्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश

  • महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच भाजपाचा शिवसेनेला पहिला धक्का

पिंपरी | प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपाची “मिशन- २०२२” सुरू केले आहे.शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी भाजपामध्ये येण्यास इच्छुक आहेत. नुकताच चिंचवड विधानसभा मतदार संघातील शिवसेना विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

चिंचवड येथील शिवसेना विभाग प्रमुख प्रल्हाद सुरेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पाटील यांची भाजपा शहर कामगार आघाडी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी पाटील म्हणाले की, भाजपा शिस्तप्रिय पक्ष असून, पक्षाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर ‘स्मार्ट ‘ होत आहे. भाजपाकडे युवकांचा ओढा जास्त असल्याचे मत प्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

भाजपाचे संघटन सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, कामगार आघाडीचे सरचिटणीस नरसिंग धनाजी यांचे उपस्थितीत भाजपामध्ये पाटील यांनी प्रवेश केला. यावेळी प्रेमसिंग गिरसे, गजानन कोठावदे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button