Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर निलंबित

Share On

नाशिक – संस्थेला २० टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांना जिल्हा कोर्टाने अटीशर्थींसह जामीन मंजूर केला असला तरी आता शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिक्षण उपसंचालकांनी झनकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल केला असतानाही निलंबन होत नसल्याने शिक्षण वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर, शिक्षण विभागाने त्यांचे निलंबन करत त्यांना चांगलाच दणका दिला आहे.

दरम्यान, माध्यमिक विभागाचा प्रभारी कारभार सहायक शिक्षण संचालक पुष्पावती पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० ऑगस्ट रोजी ताब्यात घेतल्यानंतर झनकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यांचे निलंबन होत नव्हते. तर दुसरीकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार कोणाकडे सोपविला जात नव्हता. शिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षकांचे वेतन रखडले आहेत. विभागाचे कामकाज बंद झाले. मात्र यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील शिक्षकांचे वेतन तात्काळ करण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी झनकर यांना न्यायालयाने जामीन मंजुर केला. हा जामीन मंजूर झाल्यानंतर लागलीच त्यांच्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाले आणि शिक्षण विभागाकडून निलंबनाचे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button