ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळली

पिंपरी चिंचवड | पिंपरीमध्ये आज (सोमवारी, दि. 9) सकाळी बॉम्ब सदृश वस्तू आढळली आहे. पिंपरी भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या क्रोमा शोरूम जवळ ही वस्तू आढळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ सोमवारी सकाळी बॉम्ब सदृश वस्तू आढळली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ती वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सापडलेली वस्तू ब्रिटिशकालीन बॉम्ब असल्याचे म्हटले जात आहे. आढळल्या बॉम्ब सदृश वस्तूच्या तपासणीनंतर याबाबत अधिक माहिती मिळणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button