Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; एनआयटी कॉलेजवर ईडीची धाड

नागपूर- एकीकडे ईडीने वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावूनही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहत नसताना दुसरीकडे ईडीने देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड सत्र सुरूच ठेवले आहे. आज दुपारी 12.30 च्या सुमारास ईडीने अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील साई शिक्षण संस्थेद्वारे संचलित नागपूर इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या कॉलेजवर धाड टाकली. तब्बल तीन तास ईडीकडून या कॉलेजमध्ये झाडाझडती सुरु होती. ईडीच्या या धाड सत्रामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींत अधिकच वाढ झाली आहे.

साई शिक्षण संस्थेत अनिल देशमुख हे अध्यक्ष पदावर आहेत. तर त्यांची पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहेत. दिल्लीच्या एका व्यापार्‍याने डोनेशन म्हणून या शिक्षण संस्थेला 4 कोटी दिले होते. हवाला मार्फत हे पैसे साई शिक्षण संस्थेत वळते करण्यात आले होते. त्यासाठी बोगस शेअर कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी साई शिक्षण संस्थेचा वापर केला असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे त्याचाच तपास करण्यासाठी ईडीने आज दुपारी देशमुखांच्या एनआयटी कॉलेजवर धाड टाकली. या कारवाई दरम्यान कॉलेजच्या अकाऊंटसह संगणकातील इतर माहिती ईडीच्या अधिकार्‍यांनी गोळा केल्याचे समजते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group