भाजप उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भाजप उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या निगडी, प्राधिकरणातील जनसंपर्क कार्यालयाचे भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद््घाटन झाले. नागरिकांच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय सुरु राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुप मोरे, विजय शिनकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, स्वीकृत सदस्य पांडा साने, सुनील कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपाध्यक्ष समीर जावळकर म्हणाले, ”जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून निगडी, प्राधिकरण परिसरातील नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यात येणार आहेत. या माध्यमातून जनतेची सेवा केली जाईल. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यांच्या अडी-अडचणीला धावून गेले पाहिजे. सामाजिक भान ठेवून लोकांच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कटिब्ध आहोत”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *