Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या इमारतीला भीषण आग

पुणे – पुण्यातील पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) या संस्थेच्या इमारतीला आज दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, अग्निशन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे ही भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत पाच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. आयसर पुणे ही त्यापैकी एक संस्था आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button