भाजपा किसान मोर्चातर्फे चऱ्होली येथे वृक्षारोपण अन् शेतकरी सन्मान

- डॉ. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपक्रम
- भाजपा किसान मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष तापकीर यांचा पुढाकार
पिंपरी । प्रतिनिधी
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्मामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त चऱ्होली येथील वाघेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला, अशी माहिती भाजपा किसान मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष तापकीर यांनी दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात संतोष तापकीर यांनी म्हटले आहे की,
भारतीय जनता पार्टी च-होली मोशी प्रभाग क्रमांक ३ यांच्या वतीने व पिंपरी चिंचवड भाजपा किसान मोर्चाच्या पुढाकाराने च-होली बु. येथे वाघेश्वर म़दिर परिसरामध्ये डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृति दिनानिमित्त वृक्षारोपण व शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा सरचिटणीस विजय फुगे होते. या प्रसंगी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, हभप राधा सानप, हभप आत्माराम महाराज शास्री, संजय घुंडरे पाटील, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य लक्ष्मण तापकीर, प्रविण काळजे संचालक संत तुकाराम सहकारी कारखाना, उपाध्यक्ष नंदकुमार दाभाडे, विकास बुर्डे, रामदास काळजे, बाळासाहेब मोळक, काळुराम पठारे वाघेश्वर स्व काम सेवा अध्यक्ष अशोक तापकीर, युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश काळजे, संतकृपा पतसंस्था अध्यक्ष सचिन दाभाडे, दत्तातात्या तापकीर, आनंदा तापकीर, युवा नेते शंकर भाऊ वहिले आदी उपस्थित होते.
यावेळी प्रगतिशील शेतकरी धनंजय आबा तापकीर, शांताराम तापकीर, सुनिल तापकीर, चेअरमन सुरेशराव तापकीर, शिक्षणाधिकारी विलास भिकू तापकीर, हभप वसंतराव तापकीर, शंकरराव तापकीर, वासुदेव शिंदे, विश्वास माटे, पोपट आप्पा काटे, सुदाम राव निकम, अरुण रासकर, चंद्रकांत बुर्डे, सुनिल वहिले, गुलाब बनकर, धोंडीभाऊ मोरे, काळुराम तापकीर, बबनराव तापकीर, एकनाथ तापकीर, सदाशिव वहिले, संतोष आंबेकर, निवृत्ती महाराज तापकीर, विक्रम भोसले, प्रभाकर ढोरजे, सोपान आप्पा तापकीर, किसान मोर्चा मंडल अध्यक्ष राजाराम तापकीर, सुरेश राव भोसले, उद्योजक विशाल तापकीर, मारुती कोतवाल, प्रकाश तापकीर, संतोष घुले, दत्तु परशुराम बुर्डे, नितीन भुजबळ, शिवाजी तापकीर या शेतक-यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक सुरेश भिकाजी निकम यांनी, तर आभार शिक्षण मंडळाचे माजी सदस्य लक्ष्मण तापकीर यांनी मानले.






