Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंताजनक! महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला केंद्र सरकारचा अलर्ट

नवी दिल्ली – देशात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आता कुठे नियंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने आता पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या तीनही राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे. तसेच सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट जाहीर केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासहित 80 देशांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत तसेच केरळ आणि मध्यप्रदेशमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या राज्यांना अलर्ट केलं जात आहे. त्याचबरोबर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत. पण या लसींमुळे शरीरात किती प्रमाणात अॅन्टिबॉडी तयार होतात हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने सूचना दिल्या आहेत की डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button