Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली – भारत आणि श्रीलंकेत १३ ते २५ जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. या श्रीलंका दौऱ्यावर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार राहुल द्रविड हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली आहे.

शिखर धवनच्या नेतृत्त्वात तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया या महिन्याच्या शेवटी श्रीलंका दौर्‍यावर रवाना होईल. त्यासाठी भारतीय खेळाडूंनी मुंबई गाठली आहे. या दौऱ्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल. दरम्यान, द्रविड गेली अनेक वर्षे १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि इंडिया ‘अ’ संघाला प्रशिक्षण देत आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button