प्रशांत किशोर व शरद पवार भेटीबाबत केलं वक्तव्यं- संजय राऊत

प्रशांत किशोर व शरद पवार भेटीबाबत केलं वक्तव्यं- संजय राऊत

मुंबई |

“प्रशांत किशोर व उद्धव ठाकरे यांच्या देखील अनेकदा भेटी झालेल्या आहेत. प्रशांत किशोर व राहुल गांधी यांच्या देखील भेटी झालेल्या आहेत. प्रशांत किशोर यांना मी देखील अनेकदा भेटलेलो आहे. मला प्रशांत किशोर हे या संपूर्ण राजकीय व्यवस्थेमधील एक राजकीय रणनीतीकार आहेत, त्यांची एक यंत्रण आहे व त्या राजकीय यंत्रणेचा वापर देशातील सर्वच राजकीय पक्ष घेत असतात. कधी काही हेच प्रशांत किशोर भाजपासाठी काम करत होते. नितीश कुमारांसाठी काम करत होते.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी काम करत होते. उत्तर प्रदेशात राहुल गांधींसाठी काम करत होते. मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेसाठी काम केलेलं आहे. अशा भेटीतून तुम्ही राजकाय अर्थ काढण्यापेक्षा प्रत्येक राजकीय पक्षाला अशाप्रकारच्या राजकीय यंत्रणेची गरज असते आणि शरद पवार हे सातत्याने अशाप्रकारच्या व्यक्तींना भेटून देशाच्या आणि राज्याच्या संदर्भातील काही नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत असताता हा माझा अनुभव आहे.” असं संजय राऊत यांनी याबाबत बोलताना सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *