Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण- केंद्रसरकार

  • केंद्राचा दावा; मुलांच्या लसीकरणाचा निर्णय तातडीने नाही

नवी दिल्ली |

करोना विषाणू साथीची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे नमूद करीत ३७७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली. ७ मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येने शिखर गाठले होते, परंतु आता त्यांत ६८ टक्क्यांनी घट झाल्याचेही सांगण्यात आले. त्याचबरोबर लसीकरणात प्रौढांना प्राधान्य देण्यात येणार असून लहान मुलांबाबत तातडीने निर्णय होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले. शंभराहून अधिक दैनंदिन रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्यांची संख्या २९ एप्रिल ते ५ मे या आठवड्यात ५३८ होती, ती आता २५७ पर्यंत खाली आली आहे. त्या आठवड्यात संसर्गदर २१.६२ टक्के होता, तो आता ७.२७ टक्क्यांवर आला आहे.

गेल्या २४ तासांत हा दर ६.४ टक्के होता, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी सांगितले. शिवाय, देशातील ६६ टक्के नवी रुग्णसंख्या फक्त पाच राज्यांपुरती मर्यादित राहिली आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही १० मेपासून २१ लाखांहून अधिक घट झाली असून ३७७ जिल्ह्यांमधील संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचेही अगरवाल यांनी नमूद केले. दोन महिन्यांनंतर करोना रुग्णांचा आलेख घसरत आहे. विशेषत: जेथे सध्या असलेल्या आरोग्य सुविधांच्या आधारे रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे, अशा ठिकाणी हे चित्र आहे. बहुतेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे मृत्यूचा दरही कमी होत आहे. दहा दिवसांपूर्वी दररोज ४४०० रुग्ण दगावत होते. त्या तुलनेत सध्या दररोज तीन हजारांहून कमी मृत्यू होत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button