Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण

Share On

नवी दिल्ली – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. दिलेल्या वृत्तानुसार, बिर्ला यांनी १९ मार्च रोजी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि दुसर्‍याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “ते स्थिर आहेत आणि त्याचे सगळे रिपोर्ट सामान्य आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.

बिर्ला यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे संसदेच्या सध्याच्या अधिवेशनावर याचा कसा परिणाम होईल हे केवळ वेळच सांगेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रह्लाद पटेल यांच्यासह ३० खासदारांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या वर्षी संसदेचे पावसाळी अधिवेशन रद्द करण्यात आले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button