Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड युवासेना, युवती सेना पदाधिकारी निवडीसाठी रविवारी इच्छुकांच्या मुलाखती

पिंपरी |

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी तरुणांना जोडण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातील पिपंरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील युवासेना, युवती सेना पदाधिकारी निवडीसाठी रविवारी (दि.२१) शिवसेनाभवन, आकुर्डी, पिंपरी चिंचवड शहर येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. सकाळी १० ते ११.३० या वेळेत पिंपरी विधानसभा व ११.३० ते १ पर्यंत चिंचवड विधानसभेतील मुलाखती होणार आहेत. युवासेना उपसचिव निलेश महाले, युवासेना विस्तारक रणजित कदम, युवासेना सहसचिव अश्विनी पवार इच्छुकांच्या मुलाखती घेतील.

युवासेना आणि युवती सेनेच्या कार्यकारिणीसाठी चांगली प्रतिमा असलेल्या तरुण आणि तरुणींवर भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात आणि मावळ लोकसभा मतदासरसंघात शिवसेनेची ताकद दुपटीने वाढविण्यात येणार आहे. तरुणांना शिवसेनेसोबत जोडण्यासह त्यांचे प्रश्न प्रखरतेने मांडण्याचे प्रयत्न युवासेनेकडून होणार आहेत. यात बेरोजगारी आणि शिक्षणावर भर राहणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मावळात युवासेनेची संघटनात्मक ताकद उभी करणार आहे. युवासेनेने तरुणांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेताना सेनेलाही बळ द्यावे, यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मावळ युवासेना संपर्क प्रमुख, राज्य विस्तारक राजेश पळसकर यांनी दिली आहे.

वाचा- सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुलेंना भारतरत्न देण्याचा ठराव पुणे महानगरपालिकेकडून मंजूर

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button