Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजपच्या हिराबाई उर्फ नानी घुले  यांनी तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांनी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला.  मंगळवारी, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता महापालिका भवनातील चव्हाण सभागृहात निवडणूक होणार आहे. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील संख्या बळानुसार घुले यांची निवड निश्चित मानली जात आहे. केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे भाजपकडून घुले तर राष्ट्रवादीकडून भालेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.

सत्ताधारी भाजपच्या घुले यांचा अर्ज दाखल करताना महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका सीमा सावळे, शर्मिला बाबर, नगरसेवक सागर गवळी, सुरेश भोईर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे भालेकर यांचा अर्ज दाखल करताना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रविण भालेकर, प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, संगिता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, निवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी (दि.23) रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे  महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button