Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अमृता फडणवीस यांचं खास गाणं

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त एक खास गाणं सादर केलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे गाणं आपल्या अधिकृत फेसबुक आणि युट्यूबवर शेअर केलं. ‘ये नयन डरे डरे’ असं या गाण्याचं नाव असून एका समुद्र किनाऱ्यावर ते चित्रित करण्यात आलं आहे. त्यांच्या या नव्या गाण्याचं सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी स्वागत केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर, कधी कधी सामाजिक विषयांवर अनेक गाणी सादर केली आहेत. दोन दिवसांपूर्वी व्हॅलेंटाईन वीकमध्ये त्यांनी शेअर केलेल्या रेड गाऊनमधील फोटोंची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली होती. यापैकी एका फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून त्या काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचं सूचवलं होतं. अखेर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांनी हे खास गाणं प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतसुद्धा गाणं गायलं आहे. ‘फिर से’ या गाण्याचं लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं होतं. तसेच अमृता या युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button