Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
श्री राम जन्मभूमी न्यास अयोध्यासाठी 8151 रुपयांचा श्रद्धानिधी- श्री रामभक्त गणेश जवळकर

पिंपरी | प्रतिनिधी
श्री राम जन्मभूमी न्यास अयोध्या येथील राम मंदीर निर्माणा करीता कासारवाडी येथील रामभक्तांनी निधी संकलित केला आहे. हभप दगडू मारुती जवळकर यांच्या स्मरणार्थ अर्जुन दगडू जवळकर, बबन दगडू जवळकर यांच्या तर्फे श्रद्धानिधी म्हणून 8 हजार 151 रुपये देण्यात आले. कासारवाडी केशवनगर वस्ती या परिसरात हा निधी संकलित करण्यात आला. या प्रसंगी प्रकाश जवळकर, सुधीर जवळकर, गणेश जवळकर, राहुल जवळकर, संजय शेंडगे, शेळके, पवन वर्मा, अमित चोकटे, तुकाराम पडवळ मामा, योगेश स्वामी उपस्तिथ होते.









