‘बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात…’- कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य

‘बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात…’- कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य

बॉलीवूड क्वीन कंगना रणौत सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. आता कंगनाने आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तिनं मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलं आहे. यावेळी कंगना म्हणाली की, ‘गॅंगरेप करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे.’

कंगना रणौत सध्या भोपाळमध्ये असून ती तिच्या आगामी चित्रपट ‘धाकड’ च्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. यावेळी तिने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील अल्पवयीन मुलींवर गॅंगरेप करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत भर चौकात लटकवलं जात नाही, तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत. त्याअनुषंगाने  कडक कारवाई करत भर 5-6 उदाहरणं समाजासमोर ठेवली पाहिजेत, असे कंगणा म्हणाली आहे.

‘लव्ह जिहाद कायदा चांगला आहे. हा कायदा केवळ त्यांच्यासाठी आहे, जे लव्ह जिहाद करतात. तसेच आंतरजातीय विवाहात धोका देणाऱ्या व्यक्तींसाठी हा कायदा असल्याचंही कंगना रणौतने म्हटलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *