Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

विधानसभेसाठी काँग्रेसची तयारी, राऊत, वासनिक यांना जबाबदारी

आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुड्डेचेरीमध्ये विधानसभा निवडणुका काही महिन्यांमध्ये होणार असून, काँग्रेसने यासाठी तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांना या राज्यांचे पर्यवेक्षक, निवडणूक प्रचार, व्यवस्थापन आणि समन्वयाची जबाबदारी दिली आहे. यात महाराष्ट्रातील मुकुल वासनिक, नितीन राऊत या दोन नेत्यांचा समावेश आहे.

तसेच भूपेश बघेल, अशोक गहलोत, बीके हरिप्रसाद यांच्यासह इतरही नावांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांना पक्षाचे निरिक्षक आणि विधानसभा निवडणूक प्रचार समितीवरील निरीक्षक अशी जबाबदारी सोपवली आहे.

भूपेश बघेल, मुकुल वासनिक आणि शकील अहमद खान या ज्येष्ठांकडे आसाम विधानसभा निवडणूक, अशोक गहलोत, लुईजिनो फ्लेरियो आणि जी परमेश्वर यांच्याकडे केरळ विधानसभा निवडणूक तर, विरप्पा मोईली, एम एम पल्लाम राजू आणि नितीन राऊत यांच्याकडे तामिळनाडू आणि पुड्डुचेरी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button