विकिलिक्स संस्थापक असांजेंना लंडन कोर्टाने जामीन नाकारला

लंडन – विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना लंडनच्या न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. असांजे यांना तुरुंगातच ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश वेनेसा बाराएस्टर यांनी असांजे यांचे प्रत्यार्पण अपील फेटाळले.
वाचा :-‘हा विरोध नव्हे देशद्रोह’ – जो बायडन
४९ वर्षीय ज्युलियन असांजे २०१०-११ मध्ये लष्कराचे गोपनीय दस्तऐवज विकिलिक्सच्या माध्यमातून उघड करून आपले कायदे मोडल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. जिल्हा न्यायाधीश वेनेसा बाराएस्टर यांनी म्हटले आहे की अमेरिकीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा विचार केला असता असांजे यांना जामीन दिल्यास ते एकतर आत्महत्या करू शकतात नाहीतर ते देशातून पळून जाऊ शकतात.त्यामुळे त्यांच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकत नाही .
वाचा :-फेसबुक, ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई
इराक आणि अफगाणिस्तान युध्दाशी संबधित गोपनीय दस्तऐवज उघड केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना एप्रिल २०१९मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर एका महिलेच्या लैंगिक छळाचाही आरोप होता .मात्र तो मागे घेण्यात आला होता. दरम्यान , जर अमेरिकेत ते दोषी आढळले तर त्यांना १७५ वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो .





