Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोकण बिझनेस फोरमतर्फे ‘व्हेनामी कोळंबी’ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

Share On

पुणे | प्रतिनिधी

कोकण बिझनेस  फोरमच्या वतीने व्हेनामी जातीच्या  कोळंबीच्या संवर्धन संबंधी  प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर १७ जानेवारी २०२१ रोजी  सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. कोकण बिझनेस फोरमचे संस्थापक संजय यादवराव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, https://forms.gle/PrtTVpoGexAFDvzr8 या लिंकवर जाऊन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करता येईल. गेली २० वर्ष कोळंबी शेती प्रकल्प यशस्वीपणे राबवणारे व निर्यात करणारे काशिनाथ तारी हे या प्रशिक्षणाचे मार्गदर्शक आहेत. जगभरात प्रचंड मागणी असलेली कोळंबी या उद्योगांमध्ये मागील दहा वर्षात आंध्र प्रदेश या राज्यांनी प्रचंड प्रगती केली. पुढील काळात कोकणातील बॅकवॉटर आणि समुद्रकिनारे येथे आधुनिक कोळंबी शेती प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. 

कोकणातील तरुण व्यावसायिकांसाठी सर्व जिल्ह्यात व मुंबईत मार्गदर्शनपर शिबिरे, व्हेनामी कोळंबी शेती, जिताडा पालन, खेकडा पालन, बासा, रौहु, कटला, तिलापिया, अशी विविध मस्य उत्पादने घेणारे यशस्वी मत्स्य  उद्योजक, आणि तज्ञ यांच्या मदतीने प्रत्यक्ष प्रकल्पावर प्रशिक्षण शिबिर असे अनेक उपक्रम कोकण बिझनेस फोरमच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. रविवारी १७ जानेवारी २०२१ सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेस पूर्ण दिवसाचे ‘व्हेनामी कोळंबी’ प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. कोकणात भविष्यात आपल्या भागात प्रकल्प उभारायचा आहे,  अशा कोकणवासियांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button