Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
सौरव गांगुली ह्रदयविकाराचा सौम्य झटक्यामुळे रुग्णालयात

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ह्रदयविकाराचा सौम्य झटक्यामुळे तब्येत अचानक बिघडली. त्यामुळेच त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सौरव गांगुलींवर रुग्णालयाकडून अँजियोप्लास्टी करण्यात येणार आहे.





