The new type of corona hit Asia:सिंगापूरमध्ये पहिला रुग्ण आढळला

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अशात कोरोनाच्या नव्या प्रकारची लागण झालेला रुग्ण आशिया खंडात आढळला आहे. त्यामुळे आशिया खंडातील देशांना आता मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या एक रुग्ण सिंगापूरमध्ये सापडला आहे.
वाचा :-नवीन कोरोना व्हायरस; रिंकू राजगुरू, संतोष जुवेकर, प्रियांकासह इतर सेलिब्रिटी युकेमध्येच
युरोपवरुन सिंगापूरला आलेले 31 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 11 जणांना कोरोना विषाणूच्या नव्या अवताराची लागण झाली आहे. हे सर्वजण 17 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान युरोपवरुन आले होते. सिंगापूरमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेला रुग्ण 6 डिसेंबरला सिंगापूरमध्ये आला होता. त्याचा कोरोना अहवाल 8 डिसेंबरला पॉझिटिव्ह आहा. त्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.




