Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बुद्ध विहाराचा वर्धापन दिन मर्यादित साजरा करा

Share On

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहू रोड पोलीस ठाण्याचे आवाहन

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत देहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऐतिहासिक बुद्धविहाराचा वर्धापन दिन दर वर्षी उत्साहात साजरा केला जातो. सध्य देशभरात व महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर देहू यथील बुद्धविहाराचा यंदाचा ६६ वा वर्धापन दिन मर्यादित साजरा करण्याचे आवाहन देहू पोलीस ठाण्याच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत आदेश दिले असल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकात नमूद केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, ब्रिटन मध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या विमानसेवा तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या प्रमाणे देहू बुद्धविहार येथे कमीत कमी ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. पूजा, धार्मिक विधी, वंदन कार्यक्रम कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत करायचे आवाहन करण्यात आले आहे. उपस्थितांना ओळखपत्र देण्यात येणार आहे.

या बरोबरच सुरक्षेचा उपाय म्हणून सेन्ट्रल चौक ते निगडी भक्ती शक्ती दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सेन्ट्रल चौक, मुकाई चौक, रावेत मार्गे निगडी असा वाहतुकीसाठी मार्ग सुरु ठेवण्यात येणार आहे. बुद्धविहार परिसरात साहित्य विक्री, पुस्तक स्टोल, मंडप, हातगाड्या, अन्न छत्र आदी कुठल्याही गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे वैद्यकीय सेवा, स्वच्छतागृह, पाणी टंकर, रुग्णवाहिका आदींची सुविधा दिली जाणार आहे. तसेच बरेकेटिंग केले जाणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे केले जाणर आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी बसून दर्शन घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तसेच २५ डिसेंबर रोजी देहू रोड परिसर, चिंचोली, किन्हई, मामुर्डी आदी भागात जमावबंदीचा आदेश लागू केला असल्याची माहिती देहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button