Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात चरसची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

Share On

पुणे |महाईन्यूज|

पुणे लोहमार्ग पोलिसांनी चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून एक कोटी तीन लाखाचे चरस जप्त करण्यात आले आहे.

ललीत कुमार दयानंद शर्मा (49), कोलसिंग रुपसिंग (40, रा. दोघे हिमाचल प्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. रेल्वेमार्गाने चरस पुणे, गोवा आणि मुंबई या शहरात घेऊन जाण्यात येत होता. पोलिसांना याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून आरोपीना अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक सदानंद पाटील यांनी सांगितले की, लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. १ कोटी ३ लाख रुपयांचा चरस जप्त केले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीहून रेल्वेने महाराष्ट्रात आणले होते. मुंबई, पुणे, गोवा आणि बेंगळुरू येथे त्याची विक्री केली जाणार होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button