Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedपिंपरी / चिंचवड

शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व प्लाझमा शिबिराचे रूपीनगर येथे आयोजन

Share On

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व प्लाझमा शिबिराचे आयोजन करण्यात आले. रूपीनगर येथील डॉ. गोसावी हॉस्पीटल येथे याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी म्हणून मा.सरपंच, जिल्हा परिषद सदस्य अशोक पवार, राहुल पवार यांच्या तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरात महिला व युवा कार्यकर्ते यांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. 80 जणांनी यात रक्तदान केले. यावेळी घारजाई माता युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल अशोक पवार, मा. आमदार विलास लांडे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, पंकज भालेकर, धनजय भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अमोल भालेकर, विशाल मानकरी, राष्ट्रवादी पक्षाचे रूपीनगर मधील कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button