HDFC ला RBI चा दणका; क्रेडिट कार्ड वाटप डिजिटल लाँचिंगवर रोख

मुंंबई – खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी (HDFC)ला रिझर्व्ह बँकेने (RBI) ने दणका दिला आहे. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आधीच ग्राहक त्रस्त असल्याने पुढील योजना थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.
एचडीएफसीला आपली सेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत डिजिटल लाँचिंग,नवीन क्रेडिट कार्ड वाटप इत्यादी सेवा रोखण्याचे आदेश दिले आहेत. एचडीएफसी मागील दोन वर्षांतील हा तिसरा झटका आहे.
आरबीआयने २ डिसेंबरलाच हे आदेश दिले आहेत. मुंबई शेअर बाजाराला बँकेने याची माहिती दिल्याने हा प्रकार उघड झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एचडीएफसीची सेवा ढासळली होती. इंटरनेट बँकिंग,मोबाईल बँकिंग सह इतर पेमेंट सुविधांमध्ये ग्राहकांना सातत्याने समस्या येत होत्या. २१ नोव्हेंबरला बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टिममध्ये मोठी गडबड आढळून आली होती. ही समस्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज गेल्याने उद्भवली होती.
अवश्य वाचाः अखेर भारतासमोर चीन नमला, 30 वर्षात पहिल्यांदाच केली या मालाची आयात
HDFC ने वर्षभरापूर्वी लाँच केलेल्या नवीन अॅपसंदर्भात लाखो तक्रारी आल्यानंतर जुने अॅप पुन्हा कार्यन्वित करण्याची बँकेवर नामुष्की ओढवली होती. HDFC डिजिटल 2.0 प्लॅटफॉर्म लाँच करण्याच्या मोठ्या तयारीला लागली होती. अशातच आरबीआयने रोखल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
आरबीआयने दिलेल्या आदेशात बँकेच्या बोर्डाला समस्यांचा तपास करून त्याला उत्तरदायी कोण असेल याची जबाबदारी कोणाची हे निश्चित करण्याचे म्हटले आहे. तसेच जेव्हा समस्या सोडवलेली दिसेल तेव्हाच हे निर्बंध हटविणार असल्याची सक्त ताकीद आरबीआयने दिली आहे.
HDFC बँकेनीही याबाबात म्हटलं आहे की, गेल्या दोन वर्षांत आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बॅलन्स संदर्भातील काम लवकरच बंद करण्याबाबत बँक वेगाने काम सुरू ठेवणार आहे . तसेच या संदर्भात नियामकांबरोबरच काम करत राहणार.”





