Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

भारत भालके यांचं पार्थिव पंढरपूरकडे रवाना, अंत्यदर्शनासाठी शरद पवार यांची उपस्थिती

पुणे / महाईन्यूज

 राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होत आहेत. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात निधन झालं. भारत भालके यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री 12.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

भारत भालके यांचं पार्थिव पुण्यावरुन पंढरपूरकडे रवाना झालं. पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पार्थिव दाखल झाल्यानंतर, तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर पार्थिव भालकेंचं मूळगाव सरकोली इथे नेण्यात येईल. दरम्यान, आमदार भारत भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा जाणार आहेत. साधारण दुपारी 3 पर्यंत शरद पवार पंढरपुरात पोहोचतील.

भालके यांचे पार्थिव आज (28 नोव्हेंबर) पुणे येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालं. सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान टेंभुर्णी मार्गे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मार्गे ते  पंढरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर दुपारी 1.30 ते 3.45 या वेळेत त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 4.00 वाजता त्यांच्यावर सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button