Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

SBIच्या ग्राहकांनो, एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता ओटीपी लागणार

Share On

नवी दिल्ली – तुम्ही जर एसबीआय बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन दसऱ्याच्या तोंडावर बँकेने मोठा बदल केला आहे. त्यानुसार आता ओटीपी टाकल्याशिवाय तुम्हाला पैसै काढता येणार नाहीत. एसबीआयने एक ट्वीट करत नव्या नियमांची माहिती दिली आहे. नव्या नियमानुसार, आता तुम्हाला 10 हजार रुपये कॅश काढण्यासाठी ओटीपी आवश्यक असणार आहे. म्हणजे विना ओटीपी तुम्ही बँकेतून पैसे काढू शकत नाही.

एसबीआयच्या ट्विटनुसार, आतापासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना वन टाइम पासवर्ड (OTP) टाकावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा नियम आता 24 तासांसाठी लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, नवीन नियमानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना एटीएम स्क्रीनवरील रक्कमेसह ओटीपी स्क्रीनही दिसेल. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो टाकल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button