Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांगांशी विवाह करणा-या व्यक्तीला 1 लाखांची मदत, पालिकेची महत्वाकांक्षी योजना

Share On

पिंपरी / महाईन्यूज

दिव्यांग व्यक्तींशी विवाह करणा-या व्यक्तींना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे 10 लाख रुपये वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाच्या दिव्यांग कल्याणकारी विभागांतर्गत ”संत गाडगे महाराज – दिव्यांग व्यक्तींशी विवाह करणा-या व्यक्तींना अनुदान योजना” राबविली जाते. या योजनेंतर्गत आजअखेर पाच दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 1 लाख रुपयांप्रमाणे 5 पाच लाख रुपये यापूर्वी वाटप करण्यात आले आहेत.

मात्र, आता नव्याने दहा दिव्यांग व्यक्तींना अपंग व्यक्तींशी विवाह केल्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यानुसार प्रत्येकी 1 लाख रुपयांप्रमाणे 10 लाख रुपये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

नवीन दहा लाभार्थ्यांची नावे

  1. मयूर शिवाजी वळसे
  2. स्वप्निल सुनिल शिंदे
  3. आम्रपाली साहेबराव गायकवाड
  4. चंद्रकला मानिक ढवळे
  5. धनंजय दत्तात्रय शिंगटे
  6. राहूल अशोक घनघाव
  7. दिनेश जुतबंधन तिवारी
  8. वैशाली दीपक मोतेवाड
  9. राजेंद्र श्रीरंग काेळेकर
  10. सुरेखा विनोद पार्टे

दिव्यांगांच्या कल्याणासाठी ही प्रभावी योजना राबविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील एकमेव महापालिका आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीची ही योजना आहे. ही योजना राबविण्यात पालिका कोणत्याही प्रकारची कसर करत नाही. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा.

संभाजी ऐवले, समाजविकास अधिकारी, नागरवस्ती विकास योजना विभाग

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button