Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

..’महाराजांना काय वाटत असेल?,’ ‘त्या’ चुकीवर खासदार अमोल कोल्हेंना पडला प्रश्न

पुणे |महाईन्यूज|

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर अचानक शुभेच्छांचा वर्षाव होत असल्यानं ते गोंधळून गेले आहेत. गुगल सर्चमध्ये चुकून १८ ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस दाखवला जात असल्यानं हा प्रकार घडला आहे. या निमित्तानं कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्षातून तीनदा होणाऱ्या जयंतीचा अप्रत्यक्ष संदर्भ देत प्रश्न उपस्थित केला आहे. ‘महाराजांना काय वाटत असेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

अमोल कोल्हे यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ‘आज सकाळपासून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. एकाच वर्षात दोनदा हे प्रेम अनुभवायला मिळणाऱ्या मोजक्या जणांपैकी आपण एक असल्याचे हे भाग्य आहेच! वेळात वेळ काढून अनेकजण फोनद्वारे, मेसेजद्वारे, सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वांचा ऋणी आहे,’ असं त्यांनी सुरुवातीला म्हटलं आहे.

मात्र, त्यानंतर सूर बदलत त्यांनी गुगलकडे मोर्चा वळवला आहे. ‘Google भाऊ, दोन दोन वाढदिवस पचनी नाही पडत. बरं, तिथी आणि तारीख हाही प्रकार नाही! सहज प्रश्न पडला, माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल?,’ असं त्यांनी पुढं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button