रिया चक्रवर्तीला २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

रिया चक्रवर्तीला २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई | ड्रग केस प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिले. रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज (मंगळवार, ६ ऑक्टोबर) संपत होती. याच कारणामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. यानंतर दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.

रियाने जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला आहे. मुंबई उच्च न्यायालय या अर्जावर उद्या (बुधवार, ७ ऑक्टोबर) निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. जामीन मिळाला तर रिया न्यायालयीन कोठडीतून बाहेर येईल. तिने आधी मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी याचिका केली होती. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर रियाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *