जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांना कोरोनाची लस – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांना कोरोनाची लस – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, सरकार प्रत्येक नागरिकाला लस उपलब्ध करून देण्याच्या तयारीला लागले आहे. यासाठी नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत २०- २५ कोटी भारतीयांना कोरोनाची लस टोचण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. साप्ताहिक कार्यक्रम संडे संवादमध्ये हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, ४० ते ५० कोटी डोस मिळवून ते लोकांना देण्याची सरकारची योजना आहे. थोडेफार साइडइफेक्टची शक्यता आहे, मात्र त्यामुळे लसीच्या सुरक्षेबाबत धोका नाही. सरकारने रशियाची लस स्पुटनिक-व्ही घेण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *