अफवांवर विश्वास ठेवू नका ;पिंपरी चिंचवड शहरात कोणताही लाॅकडाऊन होणार नाही :आयुक्त श्रावण हर्डीकर

अफवांवर विश्वास ठेवू नका ;पिंपरी चिंचवड शहरात कोणताही लाॅकडाऊन होणार नाही :आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता . त्यानंतर टप्याटप्प्याने बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. बाजारपेठा आणि व्यवहार सुरळीत होऊ लागले असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा सध्या शहरात पसरली आहे . त्यातून नागरिकांमध्ये विनाकारण घबराटीचे वातावरण पसरविले जात आहे .

मात्र याबाबत पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही श्री हर्डीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *