#CoronaVirus: पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु

#CoronaVirus: पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु

पुणे: मोठा गाजावाजा करत सुरु झालेलं पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं होतं. नुकतंच या जम्बो कोव्हिड रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार करण्यात आलेले आहेत. याशिवाय उद्यापासून आणखी 25 ऑक्सिजन बेड, 5 आयसीयू, तर 5 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत.

उद्या संध्याकाळपर्यंत एकूण 85 बेड तयार होतील. पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये नवीन रुग्णांना प्रवेश देण्यास आज (10 सप्टेंबर) सुरुवात करण्यात आलेली आहे. आज चार रुग्णांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त आणि जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *