Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
केंद्र सरकारकडून PUBG सह 118 चीनी अॅप्सवर बंदी

नवी दिल्ली | केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणखी 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे, यामध्ये PUBG अॅपचाही समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे.
लडाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात झालेल्या झटापटीनंतर सीमेवरील वातावरण खूपच तणावपूर्ण आहे. त्यानंतर आता भारत सरकारने ११८ चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने बंदी घालताच हे सर्व ११८ अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून काढण्यात येणार आहेत. चिनी अॅपमुळे भारताचे सार्वभौमत्व, देशाची सुरक्षा, अखंडता, भारतीय राज्यांची सुरक्षा, भारतातील सार्वजनिक व्यवस्था यांना धोका निर्माण होत असल्याचे कारण सांगत सरकारने या ११८ अॅप्सवर बंदी घातली आहे.








