Breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न घातल्यास 1000 रुपये दंड

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क वापरणाऱ्यांना 1,000 रुपये दंड करण्याचा विचार भारत सरकार करीत आहे.

सध्या मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येतो. परंतु अजित पवार यांनी हा दंड वाढविण्याचे ठरविले आहे. रुग्णांची संख्या वाढून आणि मृत्युदर वाढूनही लोक बेपर्वाईने वागत आहेत. पुणे हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला असतानाही वारंवार सूचना देऊनही लोक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे मास्क घालणाऱ्या लोकांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारावा लागणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले. अजित पवार यांच्या उपस्थित पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक कौन्सिल हॉल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button